केज दि.१६ (प्रतिनिधी)- तालुक्यातील मस्साजोग येथील एका लॉजमध्ये २५ वर्षीय तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार (दि.१७) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
अधिक माहिती अशी कि, नगर येथील २५ वर्षीय तृतीयपंथी केज तालुक्यातील मस्साजोग येथील अजिंक्य बिअरबार अॅन्ड लॉजिंगमध्ये राहत असते. या तृतीयपंथीयाने लॉजच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज शुक्रवार (दि.१७) सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक महाजनसह आदींनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
बातमी शेअर करा