Advertisement

लॉजमध्ये २५ वर्षीय तृतीयपंथ्याची गळफास घेऊन आत्महत्या  

प्रजापत्र | Friday, 16/08/2024
बातमी शेअर करा

 केज दि.१६ (प्रतिनिधी)- तालुक्यातील मस्साजोग येथील एका लॉजमध्ये २५ वर्षीय तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार (दि.१७) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

    अधिक माहिती अशी कि, नगर येथील २५ वर्षीय तृतीयपंथी केज तालुक्यातील मस्साजोग येथील अजिंक्य बिअरबार अ‍ॅन्ड लॉजिंगमध्ये राहत असते. या तृतीयपंथीयाने लॉजच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज शुक्रवार (दि.१७) सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक महाजनसह आदींनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.  

Advertisement

Advertisement