कडा - अंगणासमोर मंडप,पै-पाहुण्याची गर्दी, महिल्यांची लगबग, शेकडो लोकांसाठी गोड जेवणाचे नियोजन, हा लग्न अथवा इतर दुसरा कार्यक्रम नव्हता, तर निमित्त होते गोमातेच्या डोहाळे जेवणाचे. आष्टी येथील एका शेतकऱ्याने मोठ्या थाटामाटात गोमातेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची मात्र तालुकाभर चर्चा होताना दिसत आहे.
ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. " हौसेला मोल नसते," म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर, खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणी हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका. अशाच एक आष्टी येथील हौशी शेतकरी अशोक सायकड यांनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले. तसेच महिलांना आपल्या शेतातील गोठ्यावर बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम केला.गायीला सजवून ओवाळण्यात आले. सर्वांचे गायीसोबत फोटो सेशन झाले. गायीला हिरवा चारा देण्यात आला.
तसेच आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता. नंतर ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. हौसी शेतकरी अशोक नाना सायकड, सोमीनाथ अशोक सायकड, तुकाराम अशोक सायकड या सायकड कुटुंबीयांच्या गायीच्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.
गाईला सजवले
डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापुर्वी गाईला सजवण्यात आले. तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली. तिची शिंगे रंगवली गेली. गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेले. गाईसाठी स्वतंत्र मंडप घालण्यात आला.
दारात पंगती अन् किर्तन
डोहाळे जेवणासाठी लोकांच्या पंगती उठल्या. कृषी संस्कृतीतील देशी गाईचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी कीर्तनाचेही आयोजन केले होते. हे अनोखे डोहाळ जेवण आष्टी पंचक्रोशीत