Advertisement

अखेर पंढरपूर-खामगाव महामार्गावरील अर्धवट रस्त्याचा वनवास संपला

प्रजापत्र | Friday, 12/07/2024
बातमी शेअर करा

 कळंब (अमर चोंदे )  कळंब-येरमाळा राष्ट्रीय महामार्गावरील कन्हेरवाडी पाटी जवळ काही अंतर रस्त्याचे काम परिसरातील ग्रामस्थांच्या अडचणीमुळे रखडलेला होता या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या ठिकाणी दररोज अपघात होतात या अपघातामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या माणसाला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे तर काही जनांना कायमचे अपंगत्व आले आहे आता राहिलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह पोलीस बंदोबस्तात मेघा कंपनी कामाला लागली आहे

 रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी मेघा कंपनीने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती या मागणीला पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस निरीक्षक रवि सानप,पोलीस उपनिरीक्षक हणुमंत कांबळे,पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे,पोलीस उपनिरीक्षक श्रीराम बहुरे,महिला पोलिस अमलदार व इतर पोलिस कर्मचारी मोठ्या फौजफटा घेऊन रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत.
हाअर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी पोलीस दिवसभर थांबुन होते या राष्ट्रीय महामार्गाचे 2016 ते 2017 ला काम हाती घेण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शंभर फूट रस्ता असलेली नोंद असून हा मार्ग रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केल्यानंतर जेवढे हस्तांतर झाले तेवढ्या जागेवर रस्ता करण्यात आला होता परंतु कन्हेरवाडी पाटीवर पारधी समाजातील काही लोकांकडून या रस्त्याचे काम अडवण्यात आले होते या अर्धवट रस्त्याच्या कामासाठी  जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी,रस्ते विकास महामंडळ अधिकारी आणि रस्ता आढवणाऱ्यामध्ये नुकतीच बैठक झाली होती त्यामुळे रखडलेल्या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे या कामासाठी काही पारधी समाजाचे काही लोक व महिला जेसीबी समोर आडवे बसुन काम अडवण्यात आले होते पण कळंब पोलिस निरीक्षक रवि सानप व त्यांच्या पुर्ण स्टाफने या पारधी समाजाच्या लोकांना समजावून सांगितले व त्या ठिकाणी तळ ठोकुन  बसले होते.

तसेच या रस्त्याचे काम एका बाजूने पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या बाजूला रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे त्यामुळे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे टाकण्यात आल्यामुळे रात्री अपरात्री या ठिकाणावरून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता आदल्या दिवशीच गुरुवारी संध्याकाळी कन्हेरवाडी येथील दोन युवकांचा अपघात झाला आहे ते कळंब येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत या रस्त्याचे काम चालू केल्यामुळे पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक रवि सानप व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.                    

पोलिस निरीक्षक रवि सानप यांनी  हा रस्ता पुर्ण होईपर्यंत पोलिस संरक्षण देणार असल्याचे सांगून आंदोरा,कन्हेरवाडी,मस्सा व इतर गावातील नागरिकांनी आणि वाहन चालक मालकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले

Advertisement

Advertisement