Advertisement

तीस हजार शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचीत

प्रजापत्र | Sunday, 07/07/2024
बातमी शेअर करा

माजलगाव - केंद्र सरकारने देशभरातील शेतकर्‍यांसाठी पीएम किसान योजना सुरु असून माजलगाव तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार शेतकरी या योजनेपासून वंचीत राहिले. याला तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. आज कृषी अधिकार्‍यांच्या निषेधार्थ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

 

केंद्र सरकारने  शेतकर्‍याच्या हितासाठी पीएम किसान योजना सुरु केली मात्र सर्व शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. कृषी अधिकारी कुठल्या ना कुठल्या कारणावरून शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास टाळाटाळ करत आहेत. माजलगाव तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार शेतकरी  योजनेपासून वंचीत असून या शेतकर्‍यांचा योजनेत समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आज (दि.७)  शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन करून सुट्टीच्या दिवशी टाळ्यावर टाळे ठोकण्यात आले.  

Advertisement

Advertisement