Advertisement

कारच्या धडकेत पोलीस अधिकारी ठार

प्रजापत्र | Sunday, 07/07/2024
बातमी शेअर करा

 नेकनूर-सध्या पोलीस भरती राज्यभरात सुरु असून पोलिसांवर या भरतीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.रविवारी (दि.७) सकाळी ७ च्या सुमारास नेकनूर हद्दीत दुचाकीवरून जात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाला कारने जोराची धडक दिल्याने यात दिंद्रुड पीएसआय श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.कार चालक फरार झाला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

      राष्ट्रीय महामार्ग ५४८ वरून आज सकाळी पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी सिरसाळ्याचे पीएसआय रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुडचे पीएसआय श्रीधर नन्नवरे हे दुचाकी (एम.एच 23 ए.के.९३९७) वरून जात होते.यावेळी स्विफ्ट कर (एम.एच.२३ बी.सी.२१०८) ने धडक दिल्याने यात श्रीधर नन्नवरे यांचा जागीच मृत्यु झाला तर नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळावरून कार चालकाने पळ काढल्याचे कळते. 

 

चंद्रकांत गोसावींची तत्परता 
घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणातच नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.यावेळी गंभीर जखमी असलेल्या रमेश धोंडीराम नागरगोजे यांना उपचारासाठी बीडमधील खाजगी रुग्णालयात त्यांनी दाखल केले.तसेच अपघातातील वाहने तातडीने नेकनूर पोलीस ठाण्यात त्यांनी आणून लावली होती.गोसावी यांच्या कार्यतत्परतेमुळे नागरगोजे यांना लवकर उपचार मिळाले आहेत. 

 

Advertisement

Advertisement