शिंदे सरकारने आज (शुक्रवार) विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा बजेट सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थसंकल्पात महिलांना 1200 ते 1500 रुपये दरमहा, बेरोजगारांना दरमहा 5 हजार रुपये आणि मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना, घोषणा करण्यात आली. ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव अजित पवार यांनी मांडला.
लाडकी बहीण योजना -
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकार लागू करणार आहे. १९९४ ला महिला धोरण जाहीर झाले. महिलांसाठी सरकारनं विविध योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या २१ ते ६० वर्षाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. त्यासाठी ४६००० कोटी रुपये लागतील, असे अजित पवार म्हणाले.
महिला धोरण आखणारं महाराष्ट्र पहिलं राज्य -
विवाहित महिलांसाठी शुभमंगल योजनेचा निधी वाढवला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील जाहीर करण्यात आली. तसेच प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले आहेत. वाढवण बंदराला मंजूर देण्यात येणार असे देखील अजित पवार यांनी सांगितले.
महिलांना १० हजार पिंक रिक्षा-
राज्यात महिलांना १० हजार पिंक रिक्षा देण्यात येतील. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना ८ लाख रुपये उत्पन असलेल्या मुलींची १०० टक्के फी भरण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना -
कापूस सोयाबीन उत्पादकांना ५ हजारांचे हेक्टरी अनुदान दिले जाईल. ५ हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
गाईच्या दुधासाठी ५ रुपयांचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १ जुलैपासून हे अनुदान देण्यात येणार.