Advertisement

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच

प्रजापत्र | Wednesday, 19/06/2024
बातमी शेअर करा

  दिल्ली अबकारी धोरणातील कथित घोटाळ्यामुळे तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. यासोबतच अबकारी धोरण प्रकरणातील आरोपी विनोद चौहानच्या कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. 

 

 

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, विनोद चौहानला बीआरएस नेत्या के कविताचा पीए अभिषेक बोईनपल्ली याच्याकडून २५ कोटी रुपये मिळाले होते. हे पैसे गोवा निवडणुकीत वापरण्यात आले. 

 

केजरीवालांचे आत्मसमर्पण 
दरम्यान, दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मे महिन्यात २१  दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सात दिवस जामीन वाढवण्याची मागणी केली होती, मात्र त्यांना जामीन मिळू शकला नाही. अंतरिम जामीन कालावधी संपल्यानंतर त्यांनी २ जून रोजी तिहारमध्ये आत्मसमर्पण केले.

Advertisement

Advertisement