Advertisement

घटकपक्ष नाराज, एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं

प्रजापत्र | Wednesday, 19/06/2024
बातमी शेअर करा

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशामध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. परंतु यावेळी देशातील जनतेने भाजपला पूर्ण बहुमत दिलं नाही. त्यामुळे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या मदतीने देशामध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं.

 

 

केंद्र सरकारमध्ये जराही गडबड झाली तर एनडीएचं सरकार कोसळू शकतं, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधींनी नवीन सरकारबद्दल भाष्य केलं आहे.राहुल गांधी म्हणाले की, देशाच एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. परंतु एनडीएमधील काही घटकपक्ष आमच्या संपर्कात आहेत. सरकारमध्ये जराही गडबड झाली तर मोदी सरकार कोसळू शकतं. काही पक्षांमध्ये नाराजी असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

 

 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपने दहा वर्षे रामाच्या नावाने काढले. परंतु अयोध्येतल्या लोकांनीच भाजपचा पराभव केला. भाजप द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत तर एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. भविष्यात मोठं यश मिळणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी चारशे पारचा नारा दिला होता. परंतु घटकपक्षांना मिळूनही भाजपला तिनशेपार करता आलेले नाहीत. भाजपविरोधात देशामध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. त्यातच एनडीएला भाजपकडून गोंजारण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतंय.

Advertisement

Advertisement