Advertisement

पोलीस भरती पुढे ढकला

प्रजापत्र | Tuesday, 18/06/2024
बातमी शेअर करा

 अहमदनगर - राज्यात सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 

 

अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यातच पाऊस सुरू असल्यानं उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे. 

 

 

राज्यात उद्यापासून पोलीस भरती
राज्यात उद्यापासून म्हणजेच, १९ जून २०२४ पासून राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस भरतीसाठी १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जदारांमध्ये ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.  

Advertisement

Advertisement