Advertisement

 महावितरणच्या निष्काळजीपणामुळे १४ वर्षीय मुलाचा मृत्यु 

प्रजापत्र | Saturday, 08/06/2024
बातमी शेअर करा

 माजलगाव - महावितरणचे कर्मचारींच्या निष्काळजीपणा मुळे पात्रुड फिडरचे अधिकारी व कर्मचारी जाणिवपुर्वक गावातील महावितरण संबंधीत असलेल्या समस्या जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. काल रात्री ठिक ९.४० वाजता पात्रुड येथील घुबडे गल्ली या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने नितीन सावता जंगले, वय १४ वर्षे हा लगवीला जात असताना विद्युत पोलचा करंट त्याला लागला व त्यावेळेस तेथे उपस्थित असलेले सिध्दार्थ जंगले, किसन जंगले याना सदर बाब समजल्याने त्यांनी तात्काळ लाकडी फळीने माझा मुलगा नितीन जंगले याला बाजुला काढले तो पर्यंत नितीन बेशुध्द आवस्थेत जमीनीवर पडला. व नंतर उपचारासाठी माजलगाव येथील संजीवनी या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अशी माहिती मुलाचे वडील यांनी सांगितले रात्री सदरील मुलाला मुत्य् घोषित करण्यात आले सदर प्रकरण हे खुप गंभीर स्वरुपाचे असुन गावात नेहमीच ठिक ठिकाणी विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरुण अशा घटना नेहमीच घडत आहेत.

 

 

विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरुन काही दिवसापुर्वी आमच्या गावातील जनावरे दगावली आहेत. ह्या सर्व नैसर्गिक घटना नसुन त्या महावितरणाचा हलगर्जीपणामुळे घडत आहेत त्याबाबत महावितरण व पोलीस प्रशासनाला याची वारंवार कल्पना व सुचना देऊन गावातील लोकांनी तक्रारी अर्ज दिला होता. परंतु महावितरण तर्फे या बाबतीत कसल्याही प्रकारची दखल किंवा कार्यवाही करण्यात आलेली नव्हती
 

Advertisement

Advertisement