नवी दिल्ली- उबाठा सेनेच्या २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केलाय. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे, असा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेचा तोंड फुटलं आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, 'ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. अनेक शिवसैनिक पुन्हा येण्यासाठी आमच्याशी संवाद साधत आहेत. निर्णय हा एकनाथ शिंदे घेणार आहेत.'
उबाठा सेनेच्या २ खासदारांनी आमच्याशी संपर्क केलाय. त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपात्रतेचा विषय असल्यामुळं ते थांबले आहेत. मात्र ६ लोक जमवून ते पुन्हा आमच्यासोबत येणार आहेत. हे काल रात्री दिल्लीत घडलं आहे. आम्हाला प्रेशर टॅक्टिक करण्याची गरज नाही. मतदार आमच्या सोबत नसते तर आम्ही एवढ्या मतांनी निवडून आलो असतो का ?, असा प्रश्न म्हस्के यांनी केला.