Advertisement

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन

प्रजापत्र | Thursday, 06/06/2024
बातमी शेअर करा

 राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. 

राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर आज पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. 

Advertisement

Advertisement