Advertisement

इंडिया आघाडी देशात सत्ता स्थापन करेल

प्रजापत्र | Wednesday, 05/06/2024
बातमी शेअर करा

उद्या आम्ही दिल्लीला जाणार आहोत.  सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आमचे सर्व नवनिर्वाचित खासदार सुद्धा उद्या परवा, मुंबईला जमा होतील. आणि तिथून सगळं प्लॅनिंग केल्या जाईल. राष्ट्रपती महोदयांनी इंडिया आघाडीच्या पक्षाला  सत्ता स्थापन करण्याबाबत बोलावले तर, इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

 

 

नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना म्हणाले, सरकारमधून मुक्त व्हायचे की नाही, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपला जनतेनं नाकारलेले आहे. त्यांचे कारण पण आहे की, भाजप शेतकरी विरोधी राहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये यांच्या काळात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या देखील झालेल्या आहेत. 

 

 

शेतकरी अजूनही त्रस्त आहेत, तरुणांचे हाल केले
नाना पटोल पुढे बोलताना म्हणाले, शेतकरी अजूनही त्रस्त आहेत. तरुणांचे हाल केले, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, महागाई आणि गरिबी वाढली. आणि  त्याचाच सर्वात मोठं नुकसान भाजपला महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षातील या सगळ्या गोष्टी आहेत, आता ही बातमी बाहेर आलेली आहे, वस्तुस्थिती बाहेर आलेली नाही. ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडतील त्यावेळी यावर प्रतिक्रिया देवू, असं वक्तव्य नाना पटोले यांनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून मुक्त करण्याच्या विधानावर केलं.

 

 

 

आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा ही काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहण स्वाभाविक आहे. गेल्या पंचवीस वर्षानंतर काँग्रेसच्या पंजा चिन्हावर उमेदवार असल्याने उत्साह आहे. चौथा नंबरच्या पक्ष आज महाराष्ट्रात पहिल्या नंबरचा पक्ष झालेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा ही भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ नये स्वाभाविक आहे. आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्षांनी सोबत लढण्याची भूमिका आमची आहे, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement