Advertisement

अरविंद  केजरीवालांचा पाय खोलात

प्रजापत्र | Wednesday, 05/06/2024
बातमी शेअर करा

नवी दिल्ली :- राउस एवेन्यू कोर्टाने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मेडिकल आधारावर देण्यात येणारी जामीन य़ाचिका फेटाळली. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडी १९ जूनपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांना व्हर्चुअली कोर्टमध्ये हजर करण्यात आले. या प्रकरणात डिफॉल्ट जामीन मिळण्यासाठी केलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर दिल्ली कोर्ट ७ जून रोजी सुनावणी करणार आहे.

 

 

केजरीवाल यांची जामीनची मागणी
केजरीवाल यांनी अंतरिम जामीनसाठी याचिका दाखर केली होती. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेक चाचण्या करण्यासाठी सात दिवसांचा वेळ मागितला होता. त्यांनी जामीनसाठी याचिकादेखील दाखल केली होती. १ जून रोजी सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी याचिकेच्या ग्राह्यतेबाबत आणि उद्देशाबाबत अनेक आक्षेप घेतले होते.

Advertisement

Advertisement