मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे एनडीएच्या वतीने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी दिल्लीत जाणार असले तरी उपमुख्यमंत्री अजित त पवार मात्र, या बैठकीला दांडी मारणार आहेत, त्यांच्या ऐवजी त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला हजर राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानानंतर दिल्लीप्रमाणेच राज्यात देखील राजकीय घड़मोडींनी वेग घेतला आहे. दिल्लीत भाजपच्या मित्रपक्षांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली आहे.
बातमी शेअर करा