आष्टी दि.९ - पोखरी गावाजवळ पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील कानिफनाथ भीमराव वांढरे (३६) हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. दुचाकीवर असलेल्या त्यांची पत्नी व मुलगी या गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पांढरी येथील कानिफनाथ वांढरे हे पोखरी येथे असलेल्या कुक्कुटपालनावर शुक्रवारी रात्री पत्नी सोनाली (३०) आणि मुलगी संस्कृती (९) यांच्यासोबत दुचाकीवरून (एम.एच. २३ ए. पी.५१८०) ते गावाकडून पोखरी येथे जात होते.
पोखरी गावाजवळ एका भरधाव पिकअपने (एम.एच.१४ व्ही.९०१९ ) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.यात कानिफ वांढरे जागीच ठार झाले.तर गंभीर जखमी सोनाली वांढरे व संस्कृती वांढरे यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केले आहे.
मयत कानिफनाथ वांढरे यांच्यावर पांढरी गावी दुपारी १२ वा.मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आष्टी पोलीस स्टेशनने पंचनामा करून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे, पो.कॉ. संजय गुजर हे करीत
आहेत.
प्रजापत्र | Saturday, 09/01/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा