बीड - बीडकरांना आता वाढत्या तापमानाचा सामना करण्याची वेळ आली आहे.अगोदरच दुष्काळ, पाण्याची कमतरता, त्यात तापमानाचा पारा वाढल्याने बिडकर मात्र आता त्रस्त झाले असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.आज बीडचे तापमान हे ४२ डिग्री सेल्सिअसवर असून यामुळे नागरिकांना अति उष्णतेचा सामना करण्याची वेळ आली आहे..त्याचबरोबर लाईटचा लपंडाव आणि पाण्याची कमतरता यामुळे बीडकरांची मात्र दमछाक होत आहे.
जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून यामुळे प्रचंड उष्णता वाढली आहे. अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. रात्री झोप नाही आणि दुपारी बाहेर पडायची उष्णतेमुळे सोय नाही अशी अवस्था झाली आहे. घामाच्या धारा आणि नको जीव झाला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी लोक आता मान्सून पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा करीत आहे.
बातमी शेअर करा