Advertisement

पंकजा मुंडेंसाठी मोदी घेणार सभा

प्रजापत्र | Wednesday, 24/04/2024
बातमी शेअर करा

  बीड: बीड लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. मोदींची ६ मे रोजी बीड मतदारसंघात सभा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी दाखल केली आहे. आज त्यांची जाहिर सभा होत असतानाच त्यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेचा बुस्टर डोस देणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीड मतदारसंघात सभा घेणार आहेत. ६ मे रोजी ही सभा होणार असून यामुळे पंकजांना मोठे बळ मिळेल असे अपेक्षित आहे.

Advertisement

Advertisement