Advertisement

बीड दि.८ - पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं सांगण्यात आलं. पण ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आला आहे.

        पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलं आहे.

       दरम्यान राष्ट्रवादीनंतर भाजपनंही एक प्रसिद्धी पत्रक काढून ते सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा केला आहे. त्या सदस्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या देत राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केल्याचा आरोप भाजपनं केला आहे.भाजपचे पंचायत समिती सदस्य असलेले भरत सोनावणे, मुरलीधर साळवे आणि मोहन आचार्य यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आपला विश्वास आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा 

Advertisement

Advertisement