Advertisement

 केजमध्ये टमटमचा अपघात !

प्रजापत्र | Saturday, 13/04/2024
बातमी शेअर करा

केज दि.१३ प्रतिनिधी- चिंचोलीमाळी वरुन केज येथे आलेला रिक्षा अचानक पलटी होऊन घडलेल्या अपघातात एक महिला ठार तर एक जखमी झाल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर कळंब रोडवर आज शनिवारी दुपारी घडली आहे.

 

कमल मिठु शिंदे (वय ६० वर्ष) रा. परळी असे मयत महिलेचे नाव आहे. कमल या बहीणीच्या पतीचे निधन झाल्याने सावडण्यासाठी चिंचोलीमाळी ( ता. केज) येथे आल्या होत्या. सावडणे झाल्याने त्या परळी येथे जाण्यासाठी चिंचोलीमाळी येथून एका टमटममध्ये बसून केजपर्यंत येत होत्या. हा टमटम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर आला असता अचानक पलटी झाला. टमटम पलटी होताच कमल शिंदे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांच्यासह एक महिला जखमी असून त्यांचे नाव मात्र समजु शकले नाही.

Advertisement

Advertisement