Advertisement

परळीच्या व्यापाऱ्याला १४ लाखांना गंडा 

प्रजापत्र | Saturday, 13/04/2024
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ-३९ लाखाच्या विटांचा व्यवहार करुन  हैदराबादच्या एकाने परळीतील वीट उद्योग व्यापाऱ्याची १४ लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

    परळीतील शेख मकसूद मुजीब शेख (रा.इस्लामपुरा बंगला परळी वै) यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपी खैसर अकबर पठाण (रा.हैद्राबाद) याने वीटा खरेदीचा व्यवहार केला.यावेळी शेखकडून ३९ लाख २ हजार ७०० रुपयांच्या विटा खैसर अकबर पठाण घेऊन गेला होता.यातील २५ लाखांची रक्कम आरोपीने फिर्यादीच्या खात्यावर पाठविली. तर उर्वरित १४ लाख २ हजार ७०० रुपयापैकी ११ लाख ४५ हजारांचा चेक देण्यात आला होता.मात्र सदरचा चेक न वटल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिल्याने अर्ज चौकशीवरुन आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे हे करीत आहेत. 

Advertisement

Advertisement