Advertisement

 किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण !

प्रजापत्र | Friday, 12/04/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १२ (प्रतिनिधी)- किरकोळ कारणावरून चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव खुर्द येथे पाच लोकांनी फिर्यादीस घरातून बाहेर काढत कुन्हाडीने गंभीर मारहाण केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

मालेगाव खुर्द येथील फिर्यादी बंडु मुरली हाके (वय ४५) यांना आरोपींनी तुझ्या घरात लपवलेली माणसे बाहेर काढ म्हणत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यावर गंभीर दुखापत केली. फिर्यादीचे आरोपींनी एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, सहा तोळ्याचे झुंबर घेवून पसार झाले. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर गंभीर स्वरूपात झाले असुन या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा सजगाने, गंगाराम सजगाने, पप्पु चोरमले, देविदास भाले, अशोक भाले (सर्व रा. भालेवस्ती) यांच्या विरोधात कलम ३०७, १४७, १४८, १४९, ३२७, ५०४, ५०६ भांदवी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहा.पो.निरीक्षक एकशिंगे हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement