Advertisement

मोदी म्हणजे वसुलीखोर,गल्लीचा दादा देशाचा पंतप्रधान बनलाय

प्रजापत्र | Thursday, 11/04/2024
बातमी शेअर करा

 चंद्रपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे वाटोळे केले आहे.  इलेक्ट्रॉल बॉण्ड हा देशातील सर्वात मोठा फ्रॉड आहे.  देशाचा पंतप्रधान गल्लीचा दादा बनला आहे . आपली चौकशी होऊ नये म्हणून कंपनी बॉण्ड दिले आहेत.  याची चर्चा देशाच्या बाहेर जात आहे असा वसुलीखोर पंतप्रधान आहे, अशी जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. 

 

 

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  मोदींनी  देशाचे वाटोळे केले आहे. एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान छातीवर बसत आहे. दररोज आपले जवान शहीद होत आहे.  ५६ इंचाची छाती ही १४ इंचाची झाली आहे.  ४०० येईल असे म्हणतात पण १०४ ही येणार नाही. ही एकतर्फी लढाई नाही. जनता सरकारच्या विरोधात आहे.  उद्या कोण पंतप्रधान होईल ते नंतर पाहू पण मोदीला खेचा. 

 

 

भाजपचे उमेदवार पाडा नाहीतर हुकमशाही आल्याशिवाय राहणार नाही - प्रकाश आंबेडकर
काँग्रेस ही काँग्रेस राहिली नाही.  काँग्रेस मिंधी झाली.  भाजपला अंगावर घेतले पाहिजे ते दिसत नाही. काँग्रेसने जाहीर केलेले भंडाऱ्याचे उमेदवार नाना पटोले यांनी माघार घेतली.  सेनेचा प्रमुख लढत नाही तर सैन्य काय लढणार? काँग्रेस अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार दिला आहे. काँग्रेसने पहिले आपले अस्तित्व ओळखावे,भाजपचे एजंट ओळखावे. भाजपचे लोक म्हणतात आमच्या सारखे भ्रष्ट सरकार नाही.  प्रमुख विरोध पक्ष काँग्रेस लढायला तयार नाही . स्वतःचे स्वतंत्र अबाधीत ठेवायचे असेल तर भाजपचे उमेदवार पाडा नाहीतर हुकमशाही आल्याशिवाय राहणार नाही.  व्यापाऱ्यांनी पैसे भाजपला द्या  पण मत देऊ नका,  कारण तुमच्या घरी ed, cbi  आल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

 

 

आगामी २०२४ ते २०२९ या काळात भारतात मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही: प्रकाश आंबेडकर
आगामी  २०२४ ते २०२९ या काळात भारताच्या अनेक भागात मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही १० वर्षे झाली सत्तेत बसले अजूनही इतिहासात रेंगाळत बसले आहे. सनातनी वाद्यांनी मोदींना विचारले का? पुरावे आहे का की फक्त मोदी करणार आहे. भाजपचे नाव मिटले आहे. सरकार मोदींचे, उमेदवार कुणाचे मोदींचे, योजना मोदींच्या झेंडा भगवा झाला. आज मोदींनी राष्ट्रीय सेवा संघाचे नाव मागे टाकले कधी भेटायला गेले का? ज्या राष्ट्रीय सेवा संघाने मोदीला खुर्चीवर बसवले त्यांनीच आरएसएसला बाजूला सारले.

Advertisement

Advertisement