Advertisement

हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रजापत्र | Thursday, 11/04/2024
बातमी शेअर करा

 मुंबई - हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.वैभव पांड्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या याला त्यानं फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

 

हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसणूकीच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना व्यवसायात वैभव पांड्या यानं फसवल्याचा आरोप कऱण्यात आला होता. वैभव पांड्यासोबत पांड्या ब्रदर्सचा व्यावसाय होता. या व्यवसायात वैभव पांड्या यानं  ४.३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ३७ वर्षीय वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसवणूक प्रकऱणी अटक केली. वैभव पांड्यासोबत क्रिकेटर पांड्या बंधूंचा व्यावसाय होता. मुंबईमध्ये त्यांचा व्यवसाय सुरु होता. पण या फर्ममधून वैभव पांड्या यानं ४.३ कोटी रुपये वळते केले. याचा फटका हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना बसला,  असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खोटी सही करुन फसवणूक केल्याचा वैभव पांड्या याच्यावर आरोप आहे. 

 

 

नेमकं प्रकरण काय ? 

हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या आणि वैभव पांड्या यांनी २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यावसाय सुरु केला होता. क्रृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या प्रत्येकी ४० टक्के भांडवल घालतील, तर वैभव पांड्या २० टक्के भांडवल देईल, त्याशिवाय तो दैनंदिन कामकाज हाताळेल. या कंपनीमधून मिळणारा नफा तिघांमध्ये समान प्रमाणात वाटला जायचा. पॉलिमर व्यवसाय व्यवस्थित सुरु असतानाच, वैभव पांड्या यानं त्याच व्यापारात अन्य फर्म स्थापन केली. याबाबतची अन्य दोन सहकाऱ्यांना कोणताही क्लपना अथवा माहिती दिली नाही. एकाच वेळी दोन फर्म असल्यामुळे नफा कमी झाला. त्यामुळे जवळपास तीन कोटींचे नुकसान झाले. वैभव पांड्याने आपल्या नफ्याची टक्केवारीही गुपचूप वाढवली. त्यानं आपला नफा २० टक्क्यांवरुन ३३.३ टक्क्यांवर नेला. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचं मोठं नुकसान झालं. 

 

 

वैभव पांड्याने भागीदारी फर्मच्या खात्यातून एक कोटींपेक्षा जास्त रुपये घेऊन स्वत:च्या खात्यावर पैसे वळवले. ही बाब हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्याला समजली. त्यांनी वैभवला याचा जाब विचारला, त्यावर तुमची बदनामी करु अशी धमकी देण्यात आली

Advertisement

Advertisement