Advertisement

गजानन मंदिरात चोरी !

प्रजापत्र | Monday, 08/04/2024
बातमी शेअर करा

बीड-शहरात लगत असलेल्या बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये चोरीची घटना घडली. चोरट्यांनी मंदिरातील चांदीच्या दुरवासह साऊंड सिस्टीम चोरून नेली. सदरील हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चोरट्यांना दानपेटी फोडता आली नसल्याने रक्कम वाचली.

   कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गजानन मंदिर आहे. या मंदिरामध्ये रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या आवारात चोरी केली. मंदिरातील चार ते पाच हजार रुपयांच्या चांदीच्या दुरवा व दहा ते बारा हजार रुपयांची साऊंडसिस्टीम चोरून नेली. दानपेटी फुटल्याने आतील रक्कम वाचली.

Advertisement

Advertisement