Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थीनीवर अत्याचार 

प्रजापत्र | Sunday, 07/04/2024
बातमी शेअर करा

परळी दि.७ (प्रतिनिधी)- इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 

परळी शहरातील २० वर्षीय महाविद्यालयीन तरूणीची गंगाखेड (जि.परभणी) येथील तरूणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. तरूणाने तरूणीशी ओळख करून घेत तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गार्डनमध्ये वारंवार भेटून दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी गार्डनमधुन परळी शहरालगत असलेल्या एका शिवारात नेवून तिच्याशी शारिरीक संबंध केले. सदरील प्रकारानंतर पिडितेने दि.६ एप्रिल २०२४ रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शिवाजी मुजमूले (रा.उपळी ता. गंगाखेड जि. परभणी) याच्याविरूध्द कलम ३७६, ३७६ (२) (एन) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement