Advertisement

वसंत मोरेंचा वंचितमध्ये प्रवेश !

प्रजापत्र | Friday, 05/04/2024
बातमी शेअर करा

अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वंचितकडून पुण्यातील उमेदवारी जाहिर झाल्यानंतर वंसत मोरे हे आता अकोल्यात दाखल झाले आहे. अकोल्यातल्या कृषीनगर भागातल्या प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन निवासस्थानी वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केलाय. आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी आज वंचित झेंडा हाती घेतला. याशिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय.

दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची देखील भेट घेतली होती.  

मात्र काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि वसंत मोरेंनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यानंतर वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली. या चर्चेवर २ एप्रिलला शिक्कामोर्तब झालाय. वसंत मोरेंना पुण्यातून अधिकृत उमेदवारी वंचितकडून जाहीर झालीय. 

विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होऊन दोन दिवसानंतर अकोल्यात ते आज दाखल झाले आहे, आणि वंचितमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी प्रवेश केला आहे. या दरम्यान वसंत मोरे आणि त्यांचा मित्रपरिवार देखील उपस्थित होता.

Advertisement

Advertisement