Advertisement

कारसह पावणे पाच लाखाची बिअर पकडली

प्रजापत्र | Thursday, 04/04/2024
बातमी शेअर करा

 बीड (प्रतिनिधी)  शहरातील बसस्थानकासमोर बेकायदेशीर एका कारमध्ये बियरचे बॉक्स घेऊन जाताना पोलीसांनी पकडून एका आरोपीला ताब्यात घेत जवळपास ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील कारवाई शिवाजी नगर पोलीसांनी दुपारी १२:३० च्या सुमारास बसस्थानक समोर केली.  

अधिक माहिती अशी कि,शहरातील बसस्थानकासमोर शिवाजीनगर पोलीसांनी कोंबींग ऑपरेशन दरम्यान एका स्विफ्ट डिझायर क्रमांक एम.एच.१२. पी. क्यु.४९७२ या कारची झडती घेतली असता त्यामध्ये ७४ हजार ४९० रूपयांच्या बिअरच्या बाटल्या आढळून आल्या.पोलीसांनी कारसह बिअरच्या बाटल्या असा एकुण ४ लाख ७४ हजार ४९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन सागर सुनिल यादव (वय २४ रा. बुंदेलपुरा बीड) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रविंद्र आघाव यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement