Advertisement

२२ वर्षीय विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह  

प्रजापत्र | Tuesday, 02/04/2024
बातमी शेअर करा

केज - वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत शिंदी (ता. केज) येथे सोमवारी (१ एप्रिल) दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
वैष्णवी सिद्धेश्वर जाधव ही महिला सोमवारी सकाळी शिवारातील त्यांच्या सजगनी नावाच्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. दुपारी २.३० वाजता वैष्णवी या तरुण महिलेचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच सहायक फौजदार राजू वाघमारे, होमगार्ड प्रकाश मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, विहिरीतून मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी केज पोलिसांत सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या महिलेस एक लहान मुलगा आहे.

Advertisement

Advertisement