Advertisement

शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर

प्रजापत्र | Tuesday, 02/04/2024
बातमी शेअर करा

मुंबई- देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.

 

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आल्याचे दिसून येत आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचे बुकिंग सुरू झाले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लोकसभेच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement