Advertisement

 फडणवीसांनी दिले आठवलेंना आश्वासन !

प्रजापत्र | Monday, 01/04/2024
बातमी शेअर करा

 शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आरपीआय पक्षाकडून दावा करण्यात आला होता. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाने स्वतःकडे खेचल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज होते.

 

 

 

त्यांची नाराजी दूर झाली का असे त्यांना विचारले असता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या बदल्यात दिलेले आश्वासन जाहीर करत ते आश्वासन पाळतील अशी आशा आहे. त्यामुळे आता अम्हीणाराज नसून ती जागा सोडली असल्याचे सांगितले.डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाविषयी विचारणा केली. आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता.

 

 

मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. शिर्डीत उभ राहण्याची माझी इच्छा होती. २००९ मध्ये मी हरलो होतो. एखादी जागा मिळावी असा आमचा आग्रह होता.मात्र एकनाथ शिंदे यांची अडचण होती. देवेंद्र फडणीस यांनीही आग्रह केला होता त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. शिर्डी मध्ये सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी खासदार होते त्यामुळे प्रयत्न करूनही ती जागा सोडली नाही.

 

आता देवेंद्र फडणवीस यांनी २०२६ ला माझी राज्यसभा संपते, त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहे, आता कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात निवडणुकीनंतर विस्तार झाले की मंत्रिपद आणि एम एल सी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे . महामंडळात चेअरमन व दोन वेगवेगळी पदक यामध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल. हे सर्व बोलणं आमचे मान्य केल्यामुळे आधी नाराजी आमच्यामध्ये होती आता नाही. आरपीआय महायुतीत आहे त्यांनी आमचा विचार केलाय. मात्र जागेची अडचण आहे असे आम्हाला सांगितले. शिर्डीच्या जागेसाठी आग्रही होतो. ती त्यांना सोडता आली नाही. मात्र बाकीचे आश्वासन त्यांनी दिलेले आहेत ते पाळतील अशी आम्हाला आशा आहे. मनसे महायुतीत आलेली नाही त्यामुळे त्यांना कुठली जागा सोडण्याचा निर्णय नाही असे ही आठवले म्हणाले.

Advertisement

Advertisement