Advertisement

वसंत मोरे जरांगे पाटलांच्या भेटीला

प्रजापत्र | Saturday, 30/03/2024
बातमी शेअर करा

नुकताच मनसेला जय महाराष्ट्र करून स्वबळावर अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले वसंत मोरे अंतरवालीत दाखल झालेत. वसंत मोरे यांनी आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे जरांगे यांच्या भेटीला दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

 

 

मोरे यांनी जरांगे-पाटील सोबत पुण्यातील राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. यावेळी मोरे यांनी संपूर्ण मतदारसंघाचा अहवाल देखील आणला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या चर्चानंतर आज मोरे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.जरांगे त्यांच्या भेटीनंतर मोरे काय भूमिका जाहीर करणार हे पाहण आता महत्त्वाचे असणार आहे. स्वर्गीय गिरीश बापट यांच्या लोकसभा मतदार संघ असलेल्या पुणे शहर मतदारसंघातून मोरे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मराठा समाजाचा आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून ते अंतरवाली सराटी या ठिकाणी ते दाखल झाले त्यांनी जरांगे पाटील यांना आपला आहवालही दिला. जरांगे पाटील यांनी त्यांना मी बघतो असं, म्हणत त्यांचा अहवाल स्वीकारला आहे. जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे मोरे यांच्याबाबत ही समाजाची भूमिका स्पष्ट होणार आहे.

 

 

मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भेटी नंतर मी आज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो आहे.या वेळी मी पुण्यात मराठा समाजाचा अपक्ष सक्षम उमेदवार आहे म्हणून बघत आहे. त्यामुळे जरांगे पाटील माझा विचार करतील अशी अपेक्षा मोरे यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केलीय.

Advertisement

Advertisement