Advertisement

शासनाने सुट्टी केली रद्द पण कार्यालय बंदच

प्रजापत्र | Friday, 29/03/2024
बातमी शेअर करा

केज - शासनाकडून शुक्रवार (दि.२९) रोजीची गुडफ्रायडे निमित्ताची सुट्टी रद्द करण्यात आल्यामुळे आज सर्वच शासकीय कार्यालय सुरु राहणार आहे.मात्र हा आदेश केजच्या पंचायत समितीला लागू होत नसल्याचे चित्र आहे.शासनाकडून सुट्टी रद्द करण्यात आली असली तरीही केजचे पंचायत समिती कार्यालय बंदच आहे.

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुड फ्रायडे निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली यावर्षी शुक्रवार दि.२९ मार्च रोजी सर्व शासकीय कार्यालयांना सुट्ट्या होत्या.पण अचानक शासनाकडून 'गुड फ्रायडे'ची सुट्टी रद्द करण्यात आली व आज सर्व कार्यालय सुरु राहतील असे आदेश काढण्यात आले.शासनाचे हे आदेश केजच्या पंचा यत समितीला लागू होत नसल्याचे दिसून येत आहे.जवळपास सर्वच विभाग बंद होते.केज पंचायत समितीमधील बांधकाम विभाग,उपअभियंता यांचे कार्यालय,लघु पाठबंधारे विभाग,उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचे कार्यालय,गटविकास अधिकारी यांचे कार्यालय,बांधकाम विभाग,पंचायत विभाग,यांच्यासह बहुतांश विभागला अक्षरशः लॉक लावलेले होते.तर काही विभागांमध्ये रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या.

 

 

कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांची हेळसांड 

सुट्टी नसूनही केजचे पंचायत समिती कार्यालय आज बंद असल्यामुळे सर्वसाम्यान नागरीकांची हेळसांड पाहायला मिळाली.आपआपली महत्वाची कामे करण्यासाठी आज पंचायत समितीत आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले.एकतर मार्चचा महिना संपायला २ दिवस राहिले आहे.कार्यालयच बंद असल्यामुळे लोकांची कामे अजून एक दिवस पेंडिंगवर पडली आहे.

 

एक दिवसाचा पगार कपात करायला पाहिजे 

शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखून खुशाल कार्यालय बंद ठेवत हे अधीकारी झोपा काढत.अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल झाले. अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी व यापूढे असे प्रकार घडू नये म्हणून अनुपस्थितीत असलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात आला पाहिजे.

Advertisement

Advertisement