केज - तालुक्यातील विडा परिसरात आज गुरुवारी ( दि.२८ ) सकाळी रस्त्याच्या कडेला पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाचे मेंदू बाहेर पडलेला असल्याने हा घातपात की, अपघात या चर्चेला उधाण आले. मृतदेह आढळून आल्याने विडा परिसरात खळबळ उडाली आहे.
केज ते विडा रस्त्यावर पिंपळगाव-विड्याच्या मध्ये रस्त्याच्या कडेला सकाळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अनोळखी मृतदेह आढळल्याची वार्ता ऐकून अनेकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी गर्दी झाली. पोलीसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदन मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मृतदेहाची कवठी फूटून मेंदू बाहेर पडलेला असल्याने हा प्रकार नेमका अपघात की, घातपाताचा अशी चर्चा सुरू आहे. पोलीस तपासातून यामागील कारण समोर येईल. अद्याप पर्यंत सदर मृतदेहाची ओळख पटलेली नाही.