बीड - शहरातील सहयोग नगर भागात ९२ हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.ही कारवाई आज दुपारी १२:०० वाजता बीड शहर पोलिसांकडून करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी कि, प्रकाश भगवान मगर (वय ३५) रा. शिरसमार्ग हा अवैध दारू साठा घेऊन जात असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.बीड शहरातील सहयोग नगर येथील सर्वेश्वर गणेश मंदिराजवळ प्रकाशला दारुसाठ्यासाह पकडण्यात आले.त्याच्याकडून तब्बल ९२ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिरसाठ, मनोज परजने, अशपाक सय्यद, जयसिंग वायकर, सुरेश पवार यांनी केली.
बातमी शेअर करा