Advertisement

ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार डाव

प्रजापत्र | Tuesday, 26/03/2024
बातमी शेअर करा

मुंबई  -  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली असून काही मतदारसंघांसाठी बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्याही बैठका सुरू आहेत. आज ठाकरे गट १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत काल माध्यमांसोबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली होती. 

या यादीत कोणत्या नेत्यांना संधी मिळणार कोणत्या नेत्यांना डावलले जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडूनही आज उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची चर्चा आहे. 

 

ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार

नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), संजय देशमुख (यवतमाळ वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय जाधव (परभणी), चंद्रकांत खैरे (छत्रपती संभाजीनगर), ओमराजे निंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), राजन विचारे (ठाणे), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व ), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य), अमोल कीर्तिकर (मुंबई उत्तर पश्चिम), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), अनंत गीते (रायगड), चंद्रहार पाटील (सांगली), हातकणंगले मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला बाहेरुन पाठिंबा, संजोग वाघेरे (मावळ) या नेत्यांना ठाकरे गटातून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

 

Advertisement

Advertisement