Advertisement

प्रकाश आंबेडकरांचा शाहू महाराजांना पाठिंबा

प्रजापत्र | Saturday, 23/03/2024
बातमी शेअर करा

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहू महाराजांना काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

 

 

महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. केवळ काँग्रेसने आपल्या सात उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी सुरुच आहे. त्यापूर्वीच आता प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर बोलत होते.

Advertisement

Advertisement