Advertisement

गावठी दारू अड्ड्यावर शहर पोलीसांची कारवाई

प्रजापत्र | Friday, 22/03/2024
बातमी शेअर करा

 बीड - गावठी दारू हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करुन महिला आरोपीवर आज सकाळी पात्रुड गल्ली येथे ७:३० वाजता शहर पोलीसांनी कारवाई केली आहे.

 

 शहरातील पात्रुड गल्ली, माळीवेस भागात एका घरात गावठी हातभट्टी दारु तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना मिळाली होती . त्यांच्या  आदेशानुसार एपीआय राठोड, श्री.शिरसाट, श्री.चव्हाण,मनोज परजने,अशपाक सय्यद, सुशेन पवार यांनी कारवाई करत दारू अड्ड्यावरील  दारू तयार करण्यासाठी लागणारे ५० ते ६० हजाराचे रसायन नष्ट केले. तेथील एका महिला आरोपी विरोधात कारवाई केली.

Advertisement

Advertisement