Advertisement

 अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध,आप कार्यकर्ते रस्त्यावर

प्रजापत्र | Friday, 22/03/2024
बातमी शेअर करा

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली आहे. या अटकेनंतर सरकारकडून हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप इंडिया आघाडीकडून केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी भाजपविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.

 

पुण्यात आप कार्यकर्त्यांचे आंदोलन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन सुरू आहे. पुण्यातील भाजपच्या शहर कार्यालयासमोर आपकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

सोलापूरमध्येही आप कार्यकर्ते आक्रमक

पुण्याप्रमाणेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सोलापूरमध्येही आपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्हा परिषद गेट ते भाजप कार्यालयापर्यंत आप कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. आपच्या या आंदोनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस ही रस्त्यावर उतरले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

अटकेचा बीडमध्ये जाहीर निषेध

ईडीसीबीआयने चौकशीच्या नावाखाली निवडणुका लक्षात घेता विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आज जेलमध्ये टाकण्याचं काम केलं गेलं अशा सरकारचा जाहीर निषेध मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टी बीड येथे निषेध नोंदवत आहे. असे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना  आम आदमी पार्टी बेडच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. 

 

Advertisement

Advertisement