दिल्लीतील कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टानं जोरदार झटका दिला आहे. केजरीवाल यांना दंडात्मक कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सद्यस्थितीत अंतरिम दिलासा दिला जाऊ शकत नाही, असं कोर्टानं नमूद केलं.दिल्ली हायकोर्टाने नव्याने दाखल केलेल्या अंतरिम याचिकेवर ईडीकडून उत्तर मागितले असून, हे प्रकरण २२ एप्रिल २०२४ रोजी सूचीबद्ध केले आहे.
दिल्ली येथील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने नवव्यांदा समन्स बजावूनही केजरीवाल हे त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. केजरीवाल यांनी ईडीने बजावलेल्या समन्सवर प्रश्न उपस्थित करत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली.