Advertisement

ना शरद पवार गट, ना ठाकरे गट, ना काँग्रेस

प्रजापत्र | Thursday, 21/03/2024
बातमी शेअर करा

मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना पक्षातून बाहेर पडून आता १० दिवस उलटले आहे. या दरम्यान वसंत मोरे यांनी काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले. वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं ते वारंवार सांगत आहेत. त्यांच्या या निर्णयावर ते आजही ठाम आहे.

 

 

पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यामान आमदार रविंद्र धंगेकर रिंगणात उतरु शकतात. त्यामुळे वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणे कठीण आहे. मात्र वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, कुठल्या पक्षात जाण्यासाठी मी मनसे सोडलेली नाही. मी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो आहे. त्यानंतर मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.भाजपने पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलताना पुण्यातील निवडणूक एकतर्फी होईल असा दावा, मोहोळ यांनी केला. या दाव्याचा देखील वसंत मोरे यांनी समाचार घेतला. वसंत मोरे जोपर्यंत आहे तोपर्यंत पुण्यातील निवडणूक एकतर्फी होणार नाही.

 

 

मी एकला चलो रेच्या भूमिकेत आहे. मी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मध्यंतरीच्या काळात मी शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. पुणे शहरात कशाप्रकारे मोट बांधली जाऊ शकते हे मी सर्वांना समजावून सांगितलं. मात्र यावेळी मी निवडणूक लढवणारचं हे ठरवलं होतं. त्यामुळे आता देखील मी अपक्ष निवडणूक लढण्यास तयार आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

Advertisement

Advertisement