Advertisement

नांदेड, हिंगोली, परभणीत पहाटे भूकंपाचे धक्के !

प्रजापत्र | Thursday, 21/03/2024
बातमी शेअर करा

नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. गुरुवार सकाळी सव्वासहाच्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रत ४.२ एवढी मोजली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्हातील आखाडा बाळापूर असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे धक्के हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हात जाणवले असून प्रशासनाकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रता जास्त असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक देखील घराबाहेर पडले. नांदेड शहरासह अर्धापूर , भोकर , हदगाव , नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले. काही गावातील घरांच्या भिंतींना देखील तडे गेले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी, वसमत, औंढा यासह हिंगोली तालुक्यांतील २०० पेक्षा अधिक गावांना या भूकंपाच्या धक्क्याने हादरे बसले. या भूकंपामुळे अद्याप कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.

Advertisement

Advertisement