Advertisement

शाळांमध्ये राष्ट्रगीत,प्रार्थनेसोबत म्हटले जाणार नवीन गीत 

प्रजापत्र | Sunday, 17/03/2024
बातमी शेअर करा

मुंबई- शाळांमध्ये प्रार्थना, प्रतिज्ञा नियमित होत असते. मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावे, देशभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी, यासाठी नियमित राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा होत असते. आता राज्य सरकारकडून आणखी एका गीताचा समावेश त्यात केला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमित म्हटले जाणार आहे. त्यासंदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आले आहे. यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून कळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मागणी केली होती.

 

Advertisement

Advertisement