Advertisement

 वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडी नाही

प्रजापत्र | Sunday, 17/03/2024
बातमी शेअर करा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईमध्ये समारोप होत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीच्या नेत्यांची विराट सभेने या यात्रेचा समारोप होईल. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे जागा वाटप तसेच वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत महत्वाचे विधान केले.

 

 

काय म्हणाले संजय राऊत?

"माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे चर्चा सुरू आहे. लोकशाही मानत असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांचे भूमिका आहे या देशातील संविधान लोकशाही तसेच गरीब माणूस धोक्यात आहे. त्याची फसवणूक होत आहे आणि त्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे, असे म्हणत वंचितला सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडीचा पुढे जाण्याचा विचार नाही," असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 

 

 

"राहुल गांधी मणिपूरला जाऊ शकतात. मणिपुरमध्ये राहिले. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप मणिपूरवर बोलले नाहीत, जाऊ शकले नाहीत याचे कारण काय? तुम्ही अखंड हिंदुस्तानची भाषा करत आहे त्यात मणिपूर येत नाही का? देशाचा पंतप्रधानपदी अशी व्यक्ती बसली आहे त्याला गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही, त्यामुळे २०२४ मध्ये कायमस्वरूपी त्यांना गुजरात मध्ये पाठवण्याचा जनतेने घेतला आहे..." असे संजय राऊत म्हणाले.

Advertisement

Advertisement