Advertisement

भारतात द्वेष पसरवला जातोय

प्रजापत्र | Sunday, 17/03/2024
बातमी शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. त्यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झालेली आहे. या यात्रेचा आज मुंबईत समारोप होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची सभा पार पडणार आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेत लाखो लोकं माझ्या बरोबर चालत होते. यात्रेची शक्ती ही सगळी लोकं होती. ही भाजपसोबतची लढाई नसून दोन आत्म्यामधील लढाई आहे. 

 

 

शेतकरी मजुराला काही ज्ञान नाही, अशी त्यांची विचारसरणी आहे. देशातील वैज्ञानिकता जेवढं ज्ञान आहे, तेवढंच ज्ञान शेतकऱ्याला देखील आहे. ही दोन विचारसरणीची लढाई आहे. घाबरायचं कारण नाही, भाजप आलं तरी संविधानाला ते संपवू शकत नाही. त्यांच्यात तेवढी धमक नाही, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

 

त्यांनी माध्यमांना ताब्यात घेतलं आहे. सत्य आणि हिंदुस्तान आपल्या सोबत आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आमची यात्रा निघाली. द्वेषाचा भारत देश नाही.भारतात प्रेम आहे. भारत हा प्रेमाचा देश असताना द्वेष का पसरवला जात आहे, असा सवालही त्यांनी विचारला आहे. आपण म्हणतोय की, भाजप द्वेष पसरवत आहे. मात्र, त्याचं मूळ मी शोधलं आहे. 

Advertisement

Advertisement