शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी : - शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्सटेबल रामेश्वर पुंडलीक नागीमे( १९५२ ) वय ३२ वर्ष यांनी शिरुर अनंतपाळ येथे भाड्याने राहत असलेल्या घरी दि ३ जानेवारी व ४ जानेवारीच्या रात्री साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दु : खद घटना घडली असून शिरुर अनंतपाळ पोलीसात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल झाला आहे .
शिरूर अनंतपाळ पोलीसा कडून मिळालेली माहिती अशी की गेल्या चार वर्षा पासून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामेश्वर नागीमे हे पोलीस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत होते . खबर देणार पुंडलीक नागीमे यांनी शिरुर अनंतपाळ पोलीसांना खबर दिली की माझा मुलगा हा शिरूर अनंतपाळ येथील संकेत ढवळे यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत होता त्याची पत्नी बाळंतपणासाठी ६ महिने झाले माहेरी गेली होती तो एकटाच राह्त होता . दि ३जाने . व ४ जानेवारीच्या मध्ये रात्री खोलीमध्ये स्लॉपच्या लोखंडी सळईला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्माहत्या केल्याचे सांगीतले वडीलांच्या खबरी वरीन शिरूर अनंतपाळ पोलीसात गुन्हा रजि.नं १ / २०२१ सीआरपीसी १७४ अन्वये आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत .
त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी अशा परिवार आहे .