Advertisement

बीड जिल्ह्यात कधी होणार मतदान ?

प्रजापत्र | Saturday, 16/03/2024
बातमी शेअर करा

बीड  : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे  महाराष्ट्रात पाच टप्प्यात  मतदान होणारआहे. हे मतदान २६ एप्रिल, ७ मे , १३ मे , २० मे , २५ मे रोजी होईल.  बीड लोकसभेसाठी मतदानाची तारीख १३ मे  असणार आहे. तर धाराशिव आणि लातूरमध्ये ७ मे रोजी मतदान होईल.
लोकसभा निवडणूकांच्या तारखांच्या निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आताच झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशात ७  टप्प्यात तर राज्यात.५ टप्प्यात मतदान होणार आहे. बीड लोकसभेसाठी चौथ्या  टप्प्यात म्हणजे १३ मे रोजी मतदान होईल. तर मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. 

 

बीड लोकसभेसाठी महत्वाचे दिवस
अधिसूचना: १८ एप्रिल
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत: २५ एप्रिल
छाननी: २६ एप्रिल
अर्ज मागे घेणे:  २९ एप्रिल
मतदान: १३ मे
मतमोजणी: ४ जून

 

Advertisement

Advertisement