Advertisement

छत्रपतींचे वंशज उदयनराजेंचं पहिल्या यादीत नाव का नाही?

प्रजापत्र | Friday, 15/03/2024
बातमी शेअर करा

खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यावरच आक्षेप असून, कदम यांनीच विरोधात वातावरण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५० ते ६० पदाधिकाऱ्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

 

भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारीच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या. या दोन्ही यादीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश झालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने त्यांचा मान राखून भाजपने पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. पण तसे झाले नाही. त्यातच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यावर उदयनराजे समर्थकांचा आक्षेप आहे. त्यांनीच उमेदवारी देऊ नये, असा प्रचार काही मतदारसंघातील कार्यक्रमांत केल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

Advertisement