Advertisement

साई फर्निचर कारखान्यासह पुट्टा गोडाऊनला आग

प्रजापत्र | Friday, 15/03/2024
बातमी शेअर करा

पाटोदा- शहरातील मांजरसुंबा रोड पाटोदा येथे अनेक दिवसांपासून फर्निचर कारखाना चालू आहे. त्याच बाजुला उत्तर प्रदेशचा पुट्टा व्यापाऱ्याचे गोडाऊन आहे. आज दि.१५ शुक्रवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास  शॉर्टसर्कीटमुळे आग लागली.

अधिक माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी उमेश सदाशिव चौरे आणि बाळासाहेब गोरख चौरे यांचे पाटोदा शहरातील माजरसुंबा रोड लगत साई फर्निचर कारखाना आहे. याच बाजुला उत्तर प्रदेशचा एक फर्निचर कारागीर कशाफ अनिलकुमार जालीमप्रसाद पुट्टा व्यवसाय करायचा तेथेच पुट्टा गोडाऊनला आज सकाळी दहाच्या दरम्यान स्वाटसर्कीटमुळे आग लागली व सर्व साहित्य जुळवून खाक झाले. यावेळी पाटोदा नगरपंचायतीच्या आग्रिशामक दलाची गाडी आग विझविण्याचा प्रयत्न केले परंतु आग तेवढी भयानक होती विझविण्यास मोठी अडचन होती. यामध्ये अधिकारी, पदाधिकारी, गावातील नागरीक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कसोटीने पर्यंत करत होते मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने कोटीचं साहित्य जळून खाक झाले. 

Advertisement

Advertisement